ताज्या घडामोडी

अधिकारी भेटत नसल्याने खुर्चीला हार घालून गंगाखेडात गांधीगिरी

आम आदमी पार्टीचा पुढाकार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

महावितरन चे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे बिल भरूनही अंधारात राहण्याची वेळ आलेल्या मालेवाडी ग्रामस्थांनी गंगाखेड येथील महावितरण चे कार्यालय गाठले. आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात अनुपस्थित असलेल्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून मंगळवारी गांधीगिरी आंदोलन केले.

मरडसगाव जिल्हा परिषद मतदार संघातील मालेवाडी या गावात मागील पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे .यामुळे गावात पिण्याचे पाणी, पिठाची गिरणी, वैद्यकीय सेवा आदी महत्त्वाच्या सोयी सुविधा मिळण्यास ग्रामस्थांना अडचणी येत आहेत . यासंदर्भात मालेवाडी वासियांनी अधिकारी आली साहेब व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी फोन करून ही माहिती दिली. पण त्यांच्याकडून ग्रामस्थांचा प्रश्न सुटला नव्हता.कंटाळलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी महावितरणच्या परळी नाका भागातील कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांकडे थेट प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. पण कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हता. यावेळी ग्रामस्थांनी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना बोलावून घेत महावितरणच्या या कार्यप्रणालीस कंटाळून ग्रामस्थांनी शेवटी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी मार्गाने निषेध केला. इंजिनीयर अली साहेब हे उपस्थित नसल्याने उपविभागीय अभियंता व्हावळे यांच्याकडे जाऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी व्हावले सुद्धा उपस्थित नव्हते. परभणी चे विभागीय अभियंता चौधरी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून या व्यथा सांगितल्या. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर, भानुदास शिंदे, गणेशसिंह चंदेल, माजी सरपंच श्रीकांत गायकवाड, बंडू सिंह चंदेल , अभिनंदन मस्के, दौलत मुठाळ, आनंद चंदेल, हरी गायकवाड , शिवराज दीडशेरे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close