ताज्या घडामोडी

आष्टी येथे मनसेची शेतकऱ्यांना शेती विषयी माहिती पुस्तिका वाटुन शिवजयंती साजरी

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

शिवजयंती निमित्त मनसेतर्फे आष्टी या गावात उपसरपंच दिलीपभाऊ उपरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतीविषयी माहितीपुस्तिका वाटून शिवजयंती साजरी करण्यात आली.
वरोरा तालुक्यात मनसे रोजगार आणि ग्रामीण समस्या अग्रस्थानी ठेऊन आपली वाटचाल करत आहे.जेव्हा स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासन या विषयांकडे दुर्लक्ष करते आहे तेव्हा मनसे आपल्या स्तरावर त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे.विविध कंपन्यांना धडक देऊन त्यांच्याशी चर्चा करून मार्ग न निघाल्यास आंदोलन करत आहे. एकोना येथील मनसेचे आंदोलन सद्य परिस्थितीत चांगलेच तापले आहे कारण आंदोलन कर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तरीही रोजगारासाठी लढा सुरूच आहे .
आता मनसेतर्फे ग्रामीणभागात शिवजयंती साजरी करून गावकऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यांना घरगुती बियाणे संरक्षीत ठेवणे तसेच विद्युत ऐवजी बॅटरीने शेत संरक्षण करणे, आधुनिक शेती करणे आणि शेतातील माती परीक्षण करणे याविषयी चर्चा करण्यात आली.
त्यावेळी मनसेचे आकाश काकडे, साजिदभाऊ पठाण, शाहिद शेख, नरेशभाऊ उपरे, ओम चिकणकर, प्रजवल वाघदरकर, भूषण कठाने, सुमित आसेकर, अमन वनसिंगे, सत्या मांडवकर तसेच गावातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close